१५ जानेवारी - ७ फेब्रुवारी जिल्ह्यात नागरिकांची करणार तपासणी
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : जिल्हयात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये अरुणोदय सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहीम येत्या १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहणार नाही असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केले जात आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात मोहिमेची पूर्वतयाटी करण्यात आली आहे या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले आहे सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णाना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करुन देणे अत्यत महत्त्वाचे असून, राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये,
अशा सूचना राज्यस्तरावरून दिल्या आहेत. तपासण्याः रुग्ण, वाहक २०१२ से ३१ डिसेबर २०२५ या कालावधीत जिल्हयात एकूण ३, २८, ००० सोल्युविलिटी चाचण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये ७७ सिकलसेल रुग्ण आणि ५४३ सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २०१२ पासून सुरवात झाली असून जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती, मोफत सोल्युविलिटी
चाचणी, इलेक्ट्रोफोटेसिस व एचपीएलसी. तपासणी, रुग्णांना मोफत औषधे, टामुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.
सिकलसेल आजार म्हणजे काय ?
सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात, तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यातून सरळ निघून जातात परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो त्याला सिकलसेल क्रायसिस म्हणतात यामुळे असह्य वेदना होतात अशी इजा वारवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होती.














